आता ब्ल्यू जर्सीत दिसणार टेनिस बॉलने गोलंदाजी करणार गोलंदाज !


नवी दिल्ली – भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेनंतर आता वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. कालच या दौऱ्यासाठीच्या संघाची घोषणा करण्यात आली. रविवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बीसीसीआयच्या निवड समितीने ही घोषणा केली. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीच्या संघाची घोषणा निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी केले. 3 ऑगस्टपासून भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. यात तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळले जातील. टी-20 मालिकेपासून दौऱ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिका 8 ऑगस्ट तर कसोटी मालिका 22 ऑगस्टला सुरू होणार आहे.

दरम्यान दिल्लीच्या एका युवा गोलंदाजाला या मालिकेत टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत संघात स्थान दिले आहे. शेन वॉटसन सारख्या दिग्गज खेळाडूला आयपीएलमध्ये बंगळुरूकडून खेळणारा नवदीप सैनीने पहिल्याच सामन्यातच टक्कर दिली. आयपीएलमध्येच 151च्या वेगाने गोलंदाजी करणाऱ्या या खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधले. दरम्यान रणजीमध्ये दिल्लीकडून खेळणारा सैनी हा मुळचा हरियाणाचा आहे. सैनी आपल्या करिअरच्या सुरुवातीला 200 रुपये प्रति सामन्याच्या हिशोबाने सामना खेळायचा. तर सैनी 2013पर्यंत लेदर बॉलने नाही तर चक्क टेनिस बॉलने सराव करायचा. त्यामुळे त्याचा हा प्रवास पाहता, सैनीला भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खडतर प्रयत्न करावे लागले.

माजी कर्णधार गौतम गंभीरने रणजी स्पर्धेत दिल्ली संघाकडून खेळणाऱ्या सैनीचे कौतुक केले होते. रणजी संघासाठी 2013-14मध्ये निवड झाली होती. दरम्यान दिल्लीला 2017-18साली अंतिम फेरीत पोहचवण्यासाठी सैनीने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्याने 8 सामन्यात 34 विकेट घेतल्या होत्या. 2018मध्ये अफगाणिस्तान विरोधात झालेल्या कसोटी सामन्यात सैनीने पदार्पण केले होते. गंभीरने त्यावेळी सैनीच्या गोलंदाजीचे कौतुक केले होती. गंभीरने त्यावेळी टीम इंडियात हा खेळाडू नक्की जागा मिळवेल असे भाकित केले होते.

Leave a Comment