हे आहे जगातील पहिले वहिले पिझ्झा रेस्टोरेंट

जर तुम्हाला पिझ्झा आवडत असेल, तर असे एक ठिकाण आहे जे तुमच्या यादीत असायलाच हवे. हे ठिकाण आहे. इटलीतील नॅपेल्स शहरातील ‘अँटिका पिझ्झारिया पोर्ट अल्बा’. हे जगातील पहिले पिझ्झा रेस्टोरेंट आहे. 1738 मध्ये याची सुरूवात झाली होती. अखेर 1830 मध्ये शहरातील मध्यभागी याला हलवण्यात आले. तेव्हापासून हे व्यापाऱ्यांचे आणि पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे.

बुकस्टोर्सच्या लाईनमध्ये असलेले हे रेस्टोरेंट जगभरातील पिझ्झाची आवड असणाऱ्यांसाठी आकर्षण आहे. इटली हे फूडसाठी जगातील स्वर्ग समजले जाते. तर अँटिका पिझ्झारिया पोर्ट अल्बा हे पदार्थांची आवड असणाऱ्यांसाठी प्रसिद्ध लँडमार्क आहे.

(Source)

इटलीतील नॅपेल्स शहराला जेव्हा तुम्ही भेट देता, त्यावेळी अंटिका पिझ्झारिया पोर्ट अल्बाला नक्की भेट द्या. कारण याला पिझ्झाचे उगमस्थान म्हटले जाते. या ठिकाणाचे वातावरण देखील तुम्हाला नक्कीच आवडेल.

अमेरिकन अभिनेत्री ज्युलिया रोबर्टची प्रमूख भूमिका असलेल्या इट प्रे लव्ह या चित्रपटात देखील या रेस्टोरेंटचा उल्लेख आहे. त्यामुळे जगभरातील पर्यटक या ठिकाणी भेट देतात. येथील रिकोट्टा पिझ्झाचा तुम्ही नक्की आस्वाद घेऊ शकता.

Leave a Comment