आता ‘हेल्मेट’ घालून गोलंदाजी करणार गोलंदाज


सिडनी – गोलंदाजांच्या सुरक्षेविषयी गंभीर होत असतानाच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गोलंदाजांसाठी खास हेल्मेट तयार करण्याची योजना आखली आहे. यासंदर्भात ‘क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू’ या संकेत स्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, हेल्मेट तयार करणाऱ्या कंपनीला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्रायोगिक तत्वावर गोलंदाजांसाठी हेल्मेट तयार करण्यास सांगितले आहे. या वर्षअखेरीस हे हेल्मेट तयार होतील, असे वृत्त आहे.
क्रिकेटविश्वात टी-२० सामन्यांमुळे मागील काही वर्षांमध्ये चेंडूला ताकतीने फटकवण्याचा ट्रेंड वाढला असल्यामुळे चेंडू लागून अनेक गोलंदाजांना दुखापत झाल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. वेगवान गोलदांजाने चेंडू टाकल्यानंतर, फलंदाजांने मारलेला फटका काही वेळा समजण्यापूर्वीच चेंडू गोलंदाजाला लागलो. यामुळे गोलंदाजाला गंभीर दुखापत होते.


ऑस्ट्रेलियाचा संघ नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेमध्ये सराव करत होता. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वार्नरने या सरावादरम्यान एक जोरदार फटका लगावला. गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजालाच तो चेंडू लागल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. ऑस्ट्रेलियाने या कारणामुळे गोलंदाजासाठी खास हेल्मेट तयार करण्याची योजना आखली आहे.

फक्त गोलंदाजासाठीच ऑस्ट्रेलियाकडून तयार करण्यात येणारा हेल्मेट उपयोगी ठरत नाही. तर तो क्षेत्ररक्षकांसाठीही उपयोगी ठरणार आहे. दरम्यान, याच वर्षी फलंदाजाने मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू तोंडावर लागून ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू फवाद अहमदचा जबडा फॅक्चर झाला होता. यामुळे ऑस्ट्रेलियाकडून तयार करण्यात येत असलेल्या हेल्मेट यशस्वी झाला तर ते गोलंदाजांसाठी उपयोगी ठरणार आहे.

Leave a Comment