‘देवा’ने दिलेला कौल विराटला मान्य करावाच लागेल


नवी दिल्ली – कपिल देव यांच्यासह तिघांची सल्लागार समिती नियुक्त करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संघाचा प्रशिक्षक नेमण्यासाठी आदेश दिले आहेत. बीसीसीआयने यासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. कर्णधार विराट कोहलीचे मत येत्या काही दिवसात निवडण्यात येणाऱ्या प्रशिक्षाच्या निवडीत विचारात घेण्यात येणार नाही.

या संदर्भात एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, कर्णधार विराटची नव्या प्रशिक्षकाच्या निवडीबाबत पसंत नापसंतीचा विचार करण्यात येणार नाही, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. यामुळे यंदा कोहलीला कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेला प्रशिक्षक स्वीकारावा लागणार आहे.

विराट कोहलीला रवी शास्त्री यांच्या निवडीदरम्यान, मत विचारण्यात आले होते. मात्र, यावेळी तसे होणार नाही. दरम्यान, अनिल कुंबळे यांना पदाचा कालावधी वाढवून न देण्याच्या 2017 मध्ये विराटच्या मताला प्राधान्य देण्यात आले होते. यामुळे कोहली आणि कुंबळे यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे समोर आले होते.

Leave a Comment