तुम्ही पाहिले आहे का ‘जबरिया जोडी’मधील लव साँग


‘हसी तो फसी’ चित्रपटानंतर सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्राची जोडी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करण्यासाठी सज्ज झाली आहे. हे कलाकार ‘जबरिया जोडी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चित्रपटाचा ट्रेलर आणि एक गाणे काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आले होते. त्यानंतर आता चित्रपटातील एक लव साँग नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.


परिणीती आणि सिद्धार्थची लव केमिस्ट्री ‘ढूंढे अखियां’ असे शीर्षक असलेल्या या गाण्यात पाहायला मिळत आहे. यसीर देसाई आणि अल्तामाश फरीदी यांनी गाण्याला आवाज दिला आहे. तर बोल रश्मी आणि विराग यांचे आहेत. २ मिनीट ४६ सेकंदाचे हे गाणे प्रेक्षकांची मने नक्कीच जिंकेल.

दरम्यान परिणीती आणि सिद्धार्थशिवाय ‘जबरिया जोडी’ चित्रपटात अपारशक्ती खुराणा, संजय मिश्रा आणि जावेद जाफरी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. बिहारच्या पकड़वा विवाह पद्धतीवर हा चित्रपट आधारित असणार आहे. येत्या २ ऑगस्टला परिणीती आणि सिद्धार्थ प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Leave a Comment