सोनमने स्विकारले सोशल मीडियावरील ‘साडी चॅलेंज’


अनेक नवनवीन ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत. त्यातच १० ईअर चॅलेंज असो वा फेस अॅप फिल्टर, याची सामान्यांसोबतच कलाकारांमध्येही क्रेझ पाहायाला मिळत आहे. अशातच ट्विटरवर आता ट्रेंड होत असलेले साडी चॅलेंजही कलाकारांनी मोठ्या उत्साहाने पूर्ण केले आहे.


नुकतेच हे चॅलेंज आयुष्माननेही स्वीकारत साडीतील आपला एक फोटो पोस्ट केला होता. ज्यानंतर आपल्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या सोनमनेही आता आपला एक साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण सोनमचा हा फोटो चांगलाच चर्चेत आला आहे.

साडीतील दोन फोटो सोनमने शेअर केले आहेत. तिच्या लहानपणीचा एक फोटो असून यात तिने साडी नेसली आहे तर दुसरा लग्नानंतरचा साडीमधील फोटो आहे. आधी आणि नंतर असे कॅप्शन देत सोनमने शेअर केलेले हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. दरम्यान सोनम लवकरच द झोया फॅक्टर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यानिमित्ताने ती पहिल्यांदाच दाक्षिणात्य अभिनेता सलमान दुल्करसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

Leave a Comment