भाजपमध्ये दाखल झाले ओबीसी नेता अल्पेश ठाकोर


अहमदाबाद – भाजपमध्ये काँग्रेसचे माजी खासदार अल्पेश ठाकोर यांनी अधिकृत प्रवेश केला आहे. त्यांनी गुजराज भाजप अध्यक्ष जीतू वाघानी यांच्या उपस्थितीत पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. अल्पेश यांच्या व्यतिरिक्त भाजपमध्ये धवल सिंह जाला यांनीही प्रवेश केला आहे. ओबीसी नेता म्हणून गुजरातमध्ये अल्पेश ठाकोर यांची ओळख आहे. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसमधील उमेदवारांविरोधात ठाकोर यांनी मतदान केल्यानंतर राजीनामा दिला होता.

ठाकोर यानंतर, प्रतिक्रिया देताना म्हणाले होते, मी माझे देशाला नवीन उंचीवर घेऊन जाणाऱ्या इमानदार राष्ट्रीय नेतृत्वाला मत दिले आहे. काही दिवसांपूर्वी अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ठाकोर म्हणाले होते, मी पक्षात पक्षातील युवा नेतृत्वाकडे पाहुन प्रवेश केला होता. परंतु, माझी मोठी निराशा झाल्याने मी राजीनामा देत आहे. मला काँग्रेसमध्ये मानसिक तणावाशिवाय दुसरे काही मिळाले नाही. आता या त्रासातून मी मुक्त झालो आहे.

Leave a Comment