बहुप्रतिक्षीत ‘मिशन मंगल’चा ट्रेलर रिलीज


अक्षय कुमारसह विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शर्मन जोशी, किर्ती कुल्हरी आणि नित्या मेनन अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या आणि येत्या १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘मिशन मंगल’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात इतिहासात सुवर्णाक्षरांमध्ये नोंद करण्यात आलेल्या अंतरिक्ष यात्रेचा यशस्वी प्रवास दाखवण्यात येणार आहे.

जगन शक्ती यांनी ‘मिशन मंगल’ दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आले होते. त्यानंतर ४५ सेकंदाचा टीझरही रिलीज करण्यात आला होता. अक्षय कुमारने त्याच्या ट्विटरवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार एका वैज्ञानिकाची भूमिका साकारत आहे. अक्षय चित्रपटात राकेश धवन ही व्यक्तीरेखा साकारत असून तो या मिशनचा प्रमुख आहे.

Leave a Comment