‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड‌्स’म‌ध्ये होणार या अवाढव्य नाण्याची नोंद


न्यूयॉर्क – ‘पर्थ मिंट’ यांनी एक टन वजनाचे जगातील हे सोन्याचे सर्वात मोठे नाणे बनवले आहे. न्यूयॉर्क शेअर बाजारात मंगळवारी ते ‘पर्थ मिंट फिजिकल गोल्ड ईटीएफ’च्या लॉंचिंग निमित्त सादर करण्यात आले. ९९.९ % शुद्धतेच्या सोन्याने बनलेले हे नाणे आकारात ८० सेंमी रुंद व १२ सेंमी जाड आहे. या अवाढव्य नाण्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड‌्स’म‌ध्ये करण्यात आली आहे.