तुम्ही पाहिले आहे ‘खानदानी शफाखाना’मधील नवे गाणे


लवकरच ‘खानदानी शफाखाना’ चित्रपटात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटातील नवे रोमॅन्टिक गाणे आता रिलीज करण्यात आले आहे. अभिनेता पियांश जोरासोबत या गाण्यात सोनाक्षीचा खास अंदाज पाहायला मिळतो. या रोमॅन्टिक गाण्याचे ‘दिल जानिये’, असे बोल आहेत. सोनाक्षी आणि पियांशची रोमॅन्टिक केमेस्ट्री या गाण्यात पाहायला मिळते. या गाण्यावर जुबीन नौटीयाल आणि तुलसी कुमार यांच्या आवाजाचा स्वरसाज चढला असल्यामुळे हे गाणे प्रेक्षकांवर भूरळ पाडणारे आहे.

या गाण्याचे शब्बीर अहमद यांनी बोल लिहिले आहेत. तर, हे गाणे पायल देव यांनी कंपोज केले आहे. हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. सोनाक्षीची आगळी वेगळी भूमिका या चित्रपटात पाहायला मिळेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिल्पी दासगुप्ता यांनी केले आहे. तर, या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, मृगदीप सिंग लांबा यांनी केली आहे.

Leave a Comment