अखेर तुमच्या भेटीला आला संजुबाबाच्या ‘बाबा’चा ट्रेलर


नुकताच अभिनेता संजय दत्त याची निर्मिती असलेल्या ‘बाबा’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात झाला आहे. संजय दत्त या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. वडील आणि मुलाचे भावनिक विश्व उलगडण्याचा प्रयत्न त्याची निर्मिती असलेल्या या चित्रपटात केला आहे. बॉलिवूड अभिनेता दीपक डोब्रियाल हा या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याच्यासोबत नंदिता पाटकर, स्पृहा जोशी, अभिजीत खांडकेकर आणि बालकलाकार आर्यन मेघाजी यांच्यादेखील महत्वपूर्ण भूमिका राहणार आहेत.
या चित्रपटात विजय डोब्रियाल हा वडिलांची भूमिका साकारत आहे. तर, आर्यन हा त्याचा मुलगा ‘शंकर’ची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचा सार दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो.

यामध्ये शंकरच्या पालकत्वासाठी गरीब कुटुंब कशाप्रकारे लढा देतो, हे दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे शंकरचा साभाळ करणारे आईवडील हे मुकबधीर दाखवले असल्यामुळे त्याच्यावर हक्क गाजवणारे दुसरे आईवडील त्याला आपल्यासोबत घेऊन जाण्यासाठी गावात जात असतात. त्यामुळे शंकरचे खरे आईवडील कोण आहेत? त्याचा हक्क कोणाला मिळणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे या चित्रपटातूनच उलगडण्यात येतील. संजय दत्तने त्याचा हा पहिलाच चित्रपट त्याच्या वडिलांना समर्पित केला आहे. दिग्दर्शक राज आर. गुप्ता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. २ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Leave a Comment