‘सेक्रेड गेम्स-२’चा दुसरा टीझर रिलीज


प्रेक्षकांना बऱ्याच दिवसापासून डिजिटल विश्वात लोकप्रिय असलेल्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसिरीजची प्रतिक्षा आहे. या बरेच ट्विस्ट आणि वळणे वेबसिरीजच्या पहिल्या भागात पाहायला मिळाली. प्रेक्षकांमध्ये यातील व्यक्तीरेखादेखील फारच लोकप्रिय ठरल्या असल्यामुळेच प्रेक्षक सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या भागाचीही आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच या सिरीजचा दुसरा टीझर देखील आता रिलीज करण्यात आला आहे.

गणेश गायतोंडे, सरदारजी, बंटी, त्रिवेदी या सर्व पात्रांनी पहिल्या पर्वामध्ये प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले. शेवटी त्रिवेदी सोडून कोणीही वाचणार नाही, असे पहिल्या भागात दाखवण्यात आले होते. पण दुसऱ्या पर्वात आता त्रिवेदी सुद्धा वाचणार नाही, हे या टीझरमधुन दाखवण्यात आल्यामुळे भरपूर अनपेक्षीत गोष्टी या दुसऱ्या पर्वात पाहायला मिळतील, असा अंदाज लावला जात आहे. नेटफ्लिक्सच्या अकाऊंटवर ‘सेक्रेड गेम्स २’चा टीझर रिलीज करण्यात आला आहे. ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला १५ ऑगस्टला येणार आहे.

Leave a Comment