राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यपाल कळसुत्री बाहुले असते का? असा वादग्रस्त प्रश्न


पाटणा – बिहारच्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये राज्यपाल कळसुत्री बाहुले असते का? असा वादग्रस्त प्रश्न विचारण्यात आला आहे. या प्रश्नाची बरीच चर्चा झाली. यामध्ये आपली चूक नसल्याचे राज्यसेवा आयोगाने सांगितले आहे.

बिहारमधील राज्यसेवा आयोगाची मुख्य परीक्षा रविवारी पार पडली आहे. भारताच्या आणि विशेषत: बिहारच्या राजकारणातील राज्यपालांचे स्थान काय? ते केवळ कुळसुत्री बाहुले असते का? असा प्रश्न सामान्य ज्ञानाच्या दुसऱ्या पेपरमध्ये विचारण्यात आला होता.

नव्या वादाला या प्रश्नाने तोंड फोडले आहे. आयोगाने यावर खंत व्यक्त केली. चुकीच्या पद्धतीने प्रश्न विचारण्यात आला असून शिक्षक यामध्ये दोषी असल्याचे आयोगाने म्हटले आहे. याचबरोबर पेपर सेट करणाऱ्या शिक्षकाला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. सध्या संयुक्त जनता दल आणि भाजपची बिहारमध्ये सत्ता आहे. पुढील वर्षी राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे.

Leave a Comment