साहोच्या एका सीनवर तब्बल ७० कोटींचा खर्च?


अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर या जोडीच्या आगामी ‘साहो’बद्दलची उत्कंठा गेली दोन वर्षे ताणली गेली आहे. प्रभास ‘बाहुबली’ चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर ‘साहो’ चित्रपटासाठी घाम गाळत आहे. त्यातच आता या चित्रपटातील एका फाईट सीनसाठी तब्बल ७० कोटी खर्च करण्यात आल्याचे वृत्त आहे.

काही दिवसांपूर्वी ‘साहो’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. यातील दृष्ये पाहिल्यानंतर चित्रपट बिग बजेट आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. साहो चित्रपटाबद्दलची उत्सुकता अत्यंत वेगवान दृष्ये, नेत्रदिपक स्टंट्स आणि जबरदस्त अॅक्शन यामुळे वाढली आहे.

अबू धाबीमध्ये ‘साहो’ चित्रपटातील हा अॅक्शन सीक्वेन्स शूट करण्यात आला आहे. यात केवळ प्रभास नाही तर अभिनेत्री श्रध्दा कपूरही स्टंट करताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय कोरिओग्राफर केनी बेट्स यांनी या चित्रपटातील साहसी दृष्ये बसवली आहेत. डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी आर. माधी यांनी ही दृष्ये आपल्या सृजनशील आणि कलात्मक नजरेतून जिवंत केली आहेत. विख्यात संकलक श्रीकर प्रसाद यांनी याचे संकलन केले असून साबू सीरिल यांनी प्रॉडक्शन डिझाईन केले आहे.

जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर, यांच्या ‘साहो’ चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे.

Leave a Comment