‘या’ दिवशी रिलीज होणार ‘मिशन मंगल’चा ट्रेलर


येत्या स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर खिलाडी ‘अक्षय कुमार’चा ‘मिशन मंगल’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. अलीकडेच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. चित्रपटातील सर्व कलाकारांची झलक या टीझरमध्ये पाहायला मिळाली. या चित्रपटाचे आणखी एक नवे पोस्टर आता अक्षय कुमारने सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करुन अक्षयने ट्रेलरची तारीखही जाहिर केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणेजच १८ जुलैला प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन, शरमन जोशी, नित्या मेनन, क्रिती कुल्हारी आणि अक्षय कुमारची झलक नव्या पोस्टरमध्ये पाहायला मिळते.


अक्षयने या पोस्टरला ‘एक कहानी जिसने इंडियन स्पेस सायन्सची परिभाषा बदल दी, ‘मिशन मंगल’साठी सज्ज’, असे कॅप्शन दिले आहे. या चित्रपटात वैज्ञानिक राकेश धवन यांच्या भूमिकेत अक्षय कुमार दिसणार आहे. राकेश धवन आणि तारा शिंदे यांनी अनेक आव्हान स्विकारत ‘मंगळयान’ मिशन पूर्ण केले होते. त्यांनी भारताचा पहिला उपग्रह मंगळवार पाठवण्यासाठी अथक प्रयत्न केले होते. आता ‘मिशन मंगल’ चित्रपटात हाच थरार अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक जगन शक्ती यांनी केले आहे. तर, या चित्रपटाची निर्मिती पॅडमॅन चित्रपटाचे निर्माते ‘आर बाल्की’ यांनीच केली आहे. हा चित्रपट १५ ऑग्सट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासोबतच प्रभासचा ‘साहो’ आणि जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ हा चित्रपट देखील रिलीज होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर तगडी शर्यत पाहायला मिळेल.

Leave a Comment