प्रथमेश परबला आता या नावाने हाक मारत आहेत त्याचे चाहते


अभिनेता प्रथमेश परबने ‘बालक पालक’ चित्रपटाद्वारे सिनसृष्टीत पदार्पण केले त्यानंतर त्याला विशु नाव पडले. तर प्रथमेशला त्याचे चाहते ‘टाइमपास’ रिलीज झाल्यावर दगडू म्हणू लागले. आता त्याची ‘टकाटक’ फिल्म रिलीज झाल्यावर प्रथमेशला त्याचे चाहते या चित्रपटातील भूमिकेच्या नावाने हाक मारू लागले आहेत.

आता जिथे जाईल तिथे प्रथमेश परबला ‘ठोक्या’ अशी हाक ऐकायला येते. याविषयी प्रथमेश म्हणतो, लोकांचा चांगला प्रतिसाद माझ्या चित्रपटाला मिळाल्याने सोशल मीडियावरून आता भरभरून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. चित्रपट रिलीज झाल्यावर मी त्या विषयीच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात फिरलो. पूर्वी कुठेही दिसलो, तर फॅन्स ए दगडू अशी हाक मारत आता ठोक्या म्हणू लागले आहेत.

प्रथमेश म्हणतो, विशु काय दगडु काय किंवा ठोक्या काय .. या सर्व भूमिकांचे क्रेडीट अर्थातच माझ्या त्या-त्या चित्रपटाच्या लेखक-दिग्दर्शकांचे आहे. लोकांना सध्या ठोक्या आवडतो आहे. आपल्याला ठोक्या सारखा एक मित्र असावा, असे प्रत्येक मुलाला आणि मुलीला वाटते, हे या भूमिकेचे यश आहे. खरं तर ठोक्या चित्रपटाचा हिरोच आहे. पण तो कुठेही हिरोसारखा न वावरल्याने प्रेक्षकांना आपलासा वाटतो.

हा चित्रपट पाहायला जाणाऱ्यांची संख्या प्रथमेशसाठी जास्त आहे. प्रथमेश त्याविषयी विचारल्यावर म्हणाला, हो, सध्या अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर मी सुध्दा वाचतो आहे. डोक्याला बाम लावायचा यामध्ये माझा एक सीन आहे. तो पाहताना, प्रेक्षकांची हसता हसता अक्षरश: मुरकुंडी वळते. माझा एकही संवाद यामध्ये नसतानाही प्रेक्षकांनी हा सीन उचलून धरला आहे.

या चित्रपटामध्ये प्रथमेशचा एक मोनोलॉगही आहे. या मोनोलॉगची तुलना अनेक चाहते प्यार का पंचनामा फिल्ममधील अभिनेता कार्तिक आर्यनच्या मोनोलॉगशी करत आहेत. प्रथमेश म्हणतो, चाहत्यांच्या माझ्या मोनोलॉगवर तर प्रतिक्रिया येतच आहेत. पण फिल्ममेकर गोविंद निहलानी यांनी ही फिल्म जेव्हा पाहिली. तेव्हा त्यांनी मला शाबासकी देत म्हटले की, टकाटक मधील हा सर्वोत्तम सीन आहे. त्यांच्यासारख्या मोठ्या फिल्ममेकर कडून ही कौतुकाची थाप मिळणे, हे माझे भाग्यच म्हणावे लागेल.

Leave a Comment