ऋषी कपूरने साईन केले तीन चित्रपट


कॅन्सरच्या दुखण्यावर गेल्या सप्टेंबरपासून अमेरिकेत उपचार घेत असलेला बॉलीवूड अभिनेता ऋषी कपूर आता या दुखण्यातून पूर्ण बरा झाला आहेच पण त्याने परदेशात उपचार घेत असतानाच तीन नवे चित्रपट साईन केले असल्याचे अभिनेता शक्ती कपूर याने कपिल शर्मा शो मध्ये बोलताना सांगितले आहे. शक्ती कपूर म्हणाला, ऋषीला बघून मला खूप बरे वाटले. मी रोज त्याच्याशी बोलतो आहे.

ऋषी कपूर २ किंवा ३ सप्टेंबरला मुंबईत परत येत आहे. त्यानंतर तो पुन्हा बड्या पडद्यावर दर्शन देणार आहे. त्याच्या आजारात पत्नी नीतू सतत याच्यासोबत होतीच पण बिग बी, अमीर खान, सलमान, अनिल कपूर, दीपिका, मलाइका आणि अर्जुन कपूर, विकी कौशल अश्या अनेक अभिनेत्यानी तसेच कपिल देव, मुकेश अंबानी यांच्या सह अनेकांनी त्यांची भेट घेतली होती. ऋषी कपूर यांची झूठा कहीं का ही फिल्म १९ जुलै रोजी रिलीज होत असून हा कॉमेडी चित्रपट आहे.

Leave a Comment