परदेशी प्रवासास एकट्या जाऊ शकणार सौदी महिला


गेली काही वर्षे सुधारणांचे वारे वाहत असलेल्या कडव्या सौदी अरेबियात महिलांना थोडे अधिक अधिकार दिले जात आहेत. याचाच पुढचा भाग म्हणजे आता १८ वर्षांवरील सौदी महिला एकट्याने परदेश प्रवास करू शकणार आहेत. यासाठी नवीन कायदा केला गेला असून तो याच वर्षात लागू केला जात आहे. सध्याच्या कायद्यानुसार कोणत्याची वयाची सौदी महिला अथवा २१ वर्षाखालील पुरुष एकट्याने परदेश प्रवास करू शकत नाहीत.

सौदीमध्ये महिलांवर असलेल्या अनेक बंधनांमुळे मानव हक्क संरक्षण संस्था तसेच अनेक बड्या देशांनी सौदीवर नियंत्रणे घातली आहेत. सौदीने परदेश प्रवास नियम सैल करण्यामागे हे कारण आहेच तसेच सौदी मध्ये वाढत चाललेली शरणार्थी संख्या हेही महत्वाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या सात वर्षात येथे शरणार्थी संख्या चौपटीने वाढली आहे.

२०१२ पासून सौदी मध्ये महिलांवरची अनेक बंधने शिथिल केली जात आहेत. त्यात ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांचा सहभाग, महिलांसाठी स्पोर्ट्स सेंटर, निवडणुकीत मतदान अधिकार, महिलांना स्वतंत्र पासपोर्ट, महिलांना वाहन चालक परवाना, स्टेडियम मध्ये जाण्याची परवानगी, लष्करात सामील होण्याची मुभा, स्वतंत्र व्यवसाय मुभा, आबाया बंधन नाही अश्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. मात्र अजूनही सौदी मध्ये पुरुषांच्या अनुमतीशिवाय मुली विवाह करू शकत नाहीत.

Leave a Comment