आता गुगल मॅप्सच्या मदतीने शोधा सार्वजनिक शौचालय


आता गुगल मॅप्सच्या मदतीने सार्वजनिक शौचालये शोधता येणार आहेत. गुगल मॅप्सवर 45 हजार कम्युनिटी आणि सार्वजनिक टॉयलेट्सचा समावेश करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारच्या लू रिव्यू अभियानांतर्गत या सार्वजनिक शौचालयांना जोडण्यात आले आहे.

मंत्रालयाने सप्टेंबर 2018 मध्ये ल्यू रिव्यू कॅम्पेन सुरू करण्यासाठी गुगलबरोबर बोलणी केली होती. जेणेकरून, भारतातील सर्व स्थानिक गाइड गुगल मॅप्सवर सार्वजनिक शौचालयांचे रिव्यू आणि रेटिंग देऊ शकतील.

5 जुलै रोजी वित्त मंत्री निर्मला सूीतारमण यांनी आकड्यांबद्दल बोलताना सांगितले होते की, टॉयलेट लोकेटर फिचर अॅपमध्ये आल्याने अॅपला अधिक फायदा होईळ. अॅपने भारतातील 1700 शहरांमधील 45 हजार शौचालयांचा समावेश केला आहे. असे असले तरी, ग्रामीण भागातील शौचालयांचा या अद्याप समावेश करण्यात आलेला नाही.

या कॅम्पेनचे उद्देश आहे की, सर्व नागरिक आपल्या शहरातील सार्वजनिक शौचालय गुगल मॅप्स, गुगल सर्च आणि असिस्टेंटवर शोधू शकतील व रिव्यू देऊ शकतील.

Leave a Comment