ऋतिक- टायगरच्या ‘वॉर’चा टीझर रिलीज


बॉलिवूडचे ‘ग्रीक गॉड’ नावाने ओळखल्या जाणारे प्रसिद्ध अभिनेते ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ चाहत्यांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर रूपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे. हे कलाकार ‘वॉर’ चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र स्क्रिन शेअर करताना चाहत्यांना अनुभवता येणार आहे. चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. अॅक्शनने परिपूर्ण असलेल्या चित्रपटाची कथा अद्यापही गुलदस्त्यात आहे.

नुकत्याच रिलीज झालेल्या ‘वॉर’ चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. ऋतिक – टायगर यांच्या हॉलिवूड अॅक्शनचा प्रत्येय ५२ मिनिटांच्या या टीझरमध्ये चाहत्यांना अनुभवता येणार आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच एकूण ४८ हजारांपेक्षा जास्त चाहत्यांनी पाहिला आहे.

वाणी कपूर देखील अॅक्शनने परिपूर्ण असलेल्या ‘वॉर’ चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे. २ ऑक्टोबर रोजी ‘वॉर’ चित्रपटगृहात दाखल होणार आहे. सिद्धार्थ आनंद यांच्या खांद्यावर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आहे.

Leave a Comment