16 जुलैला दिसणाऱ्या चंद्रगहणाबद्दल जाणून घ्या खास गोष्टी


16 जुलैच्या मध्यरात्री चंद्रगहण दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रगहण असणार असून, संपुर्ण देशामध्ये दिसेल. भारतीय वेळेनुसार 16 जुलैला रात्री 1 वाजून 31 मिनिटांनी ग्रहण सुरू होणार आहे तर 17 जुलैच्या पहाटे 4 वाजून 30 मिनिटांला ग्रहण संपेल. सुर्य आणि चंद्राच्या मध्यभागी पृथ्वी फिरत असते. मात्र ते तिन्ही एका सरळ रेषेत येत नाही, अशावेळेस खंडग्रास चंद्रगहण लागत असते. रात्र असल्याने हे ग्रहण संपुर्ण भारतात दिसणार आहे. चंद्र ग्रहणाच्या दिवशीच गुरू पोर्णिमा देखील आहे. हिंदू मान्यतांनुसार, आषाढ शुक्ल पक्षाच्या पोर्णिमेच्या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला आहे. ग्रहणामुळे सुतक काळाच्या आधीच गुरू पोर्णिमेची पुजा केली जाईल. 16 जुलैला दिसणारे चंद्रगहण हे यावर्षीचे शेवटचे चंद्रगहण असणार आहे. त्यानंतर तिसरे व शेवटचे सुर्यग्रहण 16 डिसेंबरला असेल.

हे कोणते चंद्रगहण आहे ?
वर्ष 2019 चे हे अंतिम खंडग्रास चंद्रग्रहण आहे. यंदा 16 जुलैला खंडग्रास चंद्रग्रहणाचा योग आहे.

काय असते खंडग्रास चंद्रगहण ?
खंडग्रास चंद्रग्रहण हे सुर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी फिरत असते. मात्र हे तिघेही एका सरळ रेषेत येत नाहीत. अशा परिस्थिती चंद्राच्या छोट्याशा भागावर पृथ्वीच्या मधील भागाची सावली पडते. ज्याला ‘अंब्र’ असे म्हणतात. चंद्राच्या बाकी भागांवर पृथ्वीच्या बाहेरील भागांची सावली पडते, ज्याला ‘पिनम्ब्र’ असे म्हणतात. अशावेळेस आपल्याला चंद्राच्या मोठ्या भागावर पृथ्वीची सावली दिसते.

कोणत्या देशात दिसणार चंद्रग्रहण ?
हे चंद्रग्रहण पुर्ण भारतात दिसणार असून, त्याचबरोबर आशिया खंड, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेतील काही ठिकाणी हे चंद्रग्रहण दिसेल.

भारतात कोठे दिसेल हे चंद्रग्रहण ?
हे चंद्रग्रहण संपुर्ण भारतात दिसणार असले तरी देखील  बिहार, आसाम, पश्चिम बंगाल आणि ओडिसा या ठिकाणी ग्रहणाच्या वेळेतच चंद्र अस्त पावेल.

कोणत्या वेळेत दिसेल चंद्रग्रहण ?
हे चंद्रग्रहण 2 तास 59 मिनिटे असणार आहे. भारतीय वेळेनुसार, चंद्रग्रहण 16 जुलैच्या रात्री 1 वाजून 31 मिनिटांनी सुरू होईल व 17 जुलैच्या पहाटे 4 वाजून 30 मिनिटांनी समाप्त होईल. या दिवशी चंद्र संपुर्ण देशात सायंकाळी 6 ते 7 वाजून 45 मिनिटांपर्यंत उगवेल, त्यामुळे ग्रहण संपुर्ण देशात दिसेल.

हे ग्रहण कसे पहाल ?
चंद्रग्रहण बघण्यासाठी कोणतीही सावधानता बाळगण्याची गरज नसते. चंद्रग्रहण हे पुर्णपणे सुरक्षित असते. त्यामुळे ते उघड्या डोळ्यांनी देखील बघू शकता. जर तुम्ही टेलिस्कोपच्या मदतीने चंद्रग्रहण बघाल तर तुम्हाला आणखी सुंदर दृश्य दिसेल.

ग्रहणाचा सुतक काळ कधी सुरू होईल ?
शास्त्रानुसार, चंद्रग्रहणाचे सुतक हे नऊ तास आधीच सुरू होत असते. यानुसार सुतक काळ 16 जुलैला सायंकाळी 4 वाजून 31 मिनिटांनीच सुरू होईल. अशावेळेस सुतक काळाच्या आधीच गुरूपोर्णिमेची पुजा करून घेणे. सुतक काळाच्या दरम्यान पुजा केली जात नाही.

ग्रहणाच्या दुष्प्रभावापासून वाचण्यासाठी काय कराल ?
ग्रहणाच्या मागे वैज्ञानिक कारणे आहेत. मात्र धार्मिक मान्यतेनुसार ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. ग्रहण काळाला अशुभ समजले जाते. सुतकामुळे यावेळेत कोणतेच धार्मिक कार्य पार पाडले जात नाही. धार्मिक मान्यतांवर विश्वास असणारे लोक ग्रहणाच्या वेळेस शिव चालीसाचे पठण करू शकतात. त्याचबरोबर ग्रहण संपल्यावर आंघोळकरून गंगाजलने घराचे शुद्धीकरण केले पाहिजे. त्यानंतर पुजा-पाठकरून दान-दक्षिणा केली पाहिजे.

Leave a Comment