20 महिन्यांच्या मुलीसाठी बापाने स्विकारले 365 कथा लिहिण्याचे आव्हान


तस्मानियाच्या मॅट जर्बोने लहान मुलांसाठी 365 दिवसांमध्ये 365 कथा लिहिण्याचे आव्हान स्विकारले आहे. या कथा मॅट आपली 20 महिन्यांची मुलगी सीएलो हिला भेट म्हणून देणार आहे. 13 जुलै पर्यंत त्यांने 334 कथा लिहिल्या असून, ऑस्टर फार्ममध्ये काम करणारा मॅट रोज रात्री कथा लिहितात.

मॅटने या आधी चार कादंबऱ्या आणि मुलांसाठी 8 पुस्तके लिहिली आहेत. तो रात्री 10 वाजता कथा लिहिण्यास सुरूवात करतात, तर रात्री 1 वाजता ती कथा पोस्ट करतो. मॅट सांगतो की, लहान मुलांना कथा आवडतात. तुम्ही त्यांना वारसा म्हणून चांगली शिकवण, संस्कार आणि प्रेरणा याच मार्फत देऊ शकता. मी सुध्दा मुलीला एक चांगले आयुष्य देऊ इच्छितो. त्यासाठी काहीतरी केले पाहिजे ना. त्यामुळेच सुरूवात कथेपासून केली.

मॅटने सांगितले की, ‘हिंसा आणि अज्ञानता पहिल्यापासून आहे व राहिल. त्याला कल्पनेतूनच दूर करता येऊ शकते. लिखाणाबद्दल मॅटने सांगितले की, तो जेव्हा दोन वर्षांचा होता, तेव्हाच आई-वडिल वेगळे झाले. कोणीच लक्ष देणारे नव्हते. त्यामुळे फिरण्याची संधी जास्त मिळाली. मात्र आयुष्यात कोणताच उद्देश्य नव्हता. अनेक वेळा आत्महत्येचा विचार देखील आला. यातून बाहेर येण्यासाठी लिखाणाची मदत झाली.’

मॅट सांगतो की, ‘याच काळात ऑयस्टर फार्ममध्ये नोकरी मिळाली. तीन वर्षांपुर्वीच एलिनाशी भेट झाली. 38 वर्षीय एलिना वेनेजुएलाची आहे. आर्किटेक्ट असणारी एलिना सुट्टयांमध्ये तस्मानियाला आली होती. तेव्हा दोघांची भेट झाली. दीड वर्षांपुर्वी सीएलोचा जन्म झाला आहे. मुलीचा जन्म अविस्मरणीय करण्यासाठी कथा लिहिण्यास सुरुवात केली.’

1997 मध्ये मॅटची पहिली कादंबरी ‘इडियट प्राइड’ प्रकाशित झाली होती. या पुस्तकाला ऑस्ट्रेलियामध्ये ‘बुक ऑफ द इयर’ घोषित करण्यात आले होते. मॅटनुसार, तो एक चांगला पिता बनण्याचा प्रयत्न करत आहे. कथांमधून मुलीला प्रेम देत आहे. त्याची प्रत्येक कथा काहीतरी संदेश देत असते.

Leave a Comment