सुनिधी चौहानच्या आवाजातील ‘स्माईल प्लिज’चे पहिले गाणे रिलीज


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांची मुख्य भूमिका असलेला ‘स्माईल प्लिज’ हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर मागील महिन्यातच रिलीज करण्यात आल्यानंतर ३२ कलाकारांचा समावेश असलेले ‘स्माईल प्लिज’चे अँथम साँगही अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आले. या चित्रपटातील नवे गाणे आता रिलीज करण्यात आले आहे. हे मराठी गाणे प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहानने गायले आहे.

या गाण्याचे ‘अनोळखी’ असे बोल आहेत. नात्यातील हळुवार गुंफण अगदी अलगदपणे मांडणारे हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तर, हे गाणे सुनिधीच्या आवाजाने मधुर बनवले आहे. येत्या १९ जुलैला विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘स्माईल प्लीज’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर व्यतिरिक्त प्रसाद ओक, अदिती गोवित्रीकर, तृप्ती खामकर, सतीश आळेकर, वेदश्री महाजन हे देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसून येतील.

Leave a Comment