
मध्यंतरी ‘पीएम नरेंद्र मोदी’ यांच्या बायोपिकमुळे बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय चर्चेत आला होता. विवेकने यादरम्यान निवडणुका सुरू असताना एक वादग्रस्त ट्विट ऐश्वर्या राय बच्चन संबधी केले होते. त्याच्यावर त्यावेळी प्रचंड टीका झाली होती. आता अशाच एका ट्विटमुळे तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
टीम इंडियावर टीका करुन तोंडघशी पडला विवेक ऑबेरॉय
१२ जुलै रोजी भारत विरुद्ध न्युझीलंड उपांत्य फेराच्या सामन्याचा उर्वरित खेळ हा १३ जुलैला रंगला होता. पण भारताला या सामन्यात पराभव पत्कारावा लागला. क्रिकेटप्रेमींकडून या पराभवानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटत होत्या. पण या अपयशावर विवेकने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक मिम शेअर केल्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला धारेवर धरले आहे.
This is what happened to Indian fans in the #WC semi finals! #CWC19 #WorldCupSemiFinal #INDvsNZ #indiavsNewzealand pic.twitter.com/JuayObK02R
— Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) July 12, 2019
नेटकऱ्यांनी मिस्टर ओबेरॉय मॅच्युअर व्हा नाहीतर लोक नेहमी तुमच्याकडे लक्ष देणार नाहीत, असे म्हटले आहे. विवेकने निवडणुकांमधील एक्झिट पोल, ओपेनियन पोल आणि रिझल्टसंबधात ऐश्वर्या रायसंदर्भात एक मिम शेअर केले होते. त्याने या मिममध्ये ऐश्वर्या राय-सलमान खान, ऐश्वर्या-अभिषेक, आणि ऐश्वर्या-अभिषेक आणि आराध्या, असे चित्र जोडले गेले होते. या मिमवरुन त्याला बरेच ट्रोल करण्यात आले होते. शेवटी त्याने हे मिम डिलीट करुन चाहत्यांची माफी मागितली होती.
