नवी दिल्ली – सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वीच उत्तराखंडमधील भाजपचे आमदार प्रणव सिंह यांचा हातात बंदुका घेऊन दारुच्या नशेत डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या आमदार महाशयांची या कारनाम्यानंतर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून आता ते मायावतींच्या बसपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे.
‘या’ पक्षात प्रवेश करणार भाजपचा डिस्को आमदार
प्रणव सिंह चॅम्पियन यांनी ‘लांबा लांबा घूंघट काहे को डाला …’ या गाण्यावर डान्स केला होता. त्यांच्या हातात यावेळी दारुचा ग्लास आणि बंदुका दिसत होत्या. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांचे समर्थकही यावेळी त्यांच्यासोबत नाचताना पाहायला मिळाले होते. यापूर्वी जुन महिन्यात पक्षाने प्रणव सिंह चॅम्पियन यांच्यावर एका पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तीन महिन्यांच्या निलंबनाची कारवाई केली होती.