बाटला हाऊसमधील पहिल्या वहिल्या गाण्याचा टीझर तुमच्या भेटीला


येत्या स्वातंत्र्यदिनी 3 चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर होणार असल्याचे आपल्याला माहितच आहे. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असलेला बाटला हाऊस. दिल्ली पोलीस आणि दहशतवाद्यांच्यात २००८ मध्ये बाटला हाऊस येथे झालेल्या चकमकीवर हा चित्रपट आधारित असणार आहे. दरम्यान प्रेक्षकांची उत्कंठा चित्रपटाच्या रहस्यमय ट्रेलरने वाढलेली असतानाच चित्रपटातील पहिल्या वाहिल्या गाण्याचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

ओ साकी साकी असे बोल असलेल्या या गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. आपल्या डॅशिंग अंदाजामुळे ओळखल्या जाणाऱ्या नोरा फतेहीचा खास डान्स यात आपल्याला पाहायला मिळत आहे. संजय दत्तच्या मुसाफिर चित्रपटातील साकी साकी गाण्याचे हे गाणे रिक्रिएट व्हर्जन आहे. १५ जुलैला हे संपूर्ण गाणे रिलीज करण्यात येणार आहे.

सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कडने या नव्या व्हर्जनला आवाज दिला आहे. नोरा फतेही आपल्यासाठी लकी असल्याचे जॉनने एका मुलाखतीदरम्यान बोलताना म्हटले होते. याधीही जॉनच्या ‘सत्यमेव जयते’ चित्रपटातील ‘दिलबर-दिलबर’ गाण्यावर नोराने डान्स केला आहे. दरम्यान ‘बाटला हाऊस’ चित्रपट येत्या १५ ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment