‘जजमेंटल हैं क्या’मधील पहिले वहिले गाणे रिलीज


क्वीन चित्रपटानंतर कंगना आणि राजकुमार राव पुन्हा एकदा एकत्र झळकणार असून ही जोडी आगामी ‘जजमेंटल हैं क्या’ चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. शीर्षकाच्या वादापासून रिलीज डेटपर्यंत हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला.

नुकतेच या चित्रपटातील पहिले वहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचे ‘द वखरा साँग’ असे शीर्षक असून २०१५ मध्ये आलेल्या बादशाह आणि नव इंदर यांच्या ‘वखरा’ स्वॅग गाण्याचे हे गाणे रिमिक्स व्हर्जन आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या गाण्याचा व्हिडिओ चित्रपटाची निर्मात्री एकता कपूरने शेअर केला आहे.

नव इंदर, लिसा मिश्रा आणि रजा कुमारी यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. या चित्रपटात कंगना आणि राजकुमार राव यांच्याशिवाय जिम्मी शेरगिल आणि अमयरा दस्तूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. येत्या २६ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment