जॉनने शेअर केला ‘बाटला हाऊस’चा टीझर


लवकरच एका सत्य घटनेवर आधारित चित्रपटातून बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिल्लीतील २००८ च्या ‘बाटला हाऊस’ चकमक प्रकरणावर आधारलेला बाटला हाऊस असे शीर्षक असलेला हा चित्रपट असणार आहे. दरम्यान आपल्या ट्विटरवरून या चित्रपटातील आणखी एक व्हिडिओ जॉनने शेअर केला आहे.


दिल्ली पोलीस आणि ४ दहशतवाद्यांमध्ये १९ सप्टेंबरच्या दिवशी झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांचा मृत्यू झाला होता. पण अनेकांनी याविरोधात नंतर आंदोलने करत दिल्ली पोलिसांनी निर्दोष विद्यार्थ्यांना मारल्याचे म्हणत या घटनेचा तीव्र निषेध केला होता. हा राजकारणी आणि पोलिसांचा डाव असल्याचेही अनेकांनी म्हटले होते.


जॉन या टीझरच्या शेवटी आम्ही नाही म्हणत, की ते विद्यार्थी नव्हते, मात्र खरंच ते निर्दोष होते का? असा सवाल विचारत आहे. या चित्रपटातून त्या रात्री नेमके काय झाले होते? आणि यामागची सत्य कथा काय आहे? हे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम पोलीस अधिकारी संजय कुमार यादव यांची भूमिका साकारणार आहे. या चकमकीत संजय कुमार यादव यांनी पोलीस पथकाचे नेतृत्त्व केले होते.

Leave a Comment