जॉनच्या ‘बाटला हाऊस’चा टीझर रिलीज


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला दिल्लीतील २००८ च्या ‘बाटला हाऊस’ चकमक प्रकरणावर आधारलेला ‘बाटला हाऊस’ चित्रपट येणार आहे. पोस्टरनंतर आता या चित्रपटाचा टीझर देखील रिलीज करण्यात आला आहे. अनेक वेगवेगळ्या कथा या घटनेवर रचल्या गेल्या. पण, अकरा वर्षांनंतर आम्ही तुमच्यासमोर यामागची खरी कथा मांडणार आहोत, असे या टीझरमध्ये म्हटले गेले आहे.

या टीझरमध्ये बाटला हाऊसमध्ये त्या दिवशी नक्की काय झाले? आम्ही चुकीचे होतो? की मी चुकीचा होतो? असे जॉनचे शब्द ऐकायला मिळतात. जॉन अब्राहम पोलीस अधिकारी संजय कुमार यादव यांची भूमिका या चित्रपटात साकारणार आहे. संजय कुमार यादव यांनी या चकमकीत पोलीस पथकाचे नेतृत्त्व केले होते


१९ सप्टेंबर २००८ रोजी सकाळी ११ वाजता दक्षिण दिल्लीतील जामिया नगरातील एल-१८ बाटला हाऊस येथे दिल्ली पोलिसांचा विशेष चमू आणि इंडियन मुजाहिदीनचे चार दहशतवादी यांच्यात चकमक झाली. आतिफ अमिन आणि महम्मद साजिद हे दहशतवादी दोन तासांच्या धुमश्चक्रीत ठार झाले, तर विशेष दलाचे निरीक्षक मोहन चंद शर्मा यांना वीरमरण आले. याच घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर या सर्वादरम्यान विवादात अडकलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची कथा आणि त्या रात्रीची खरी बाजू मांडण्यात येणार आहे.

Leave a Comment