इमरान हाश्मीच्या आगामी वेबसिरीजमधील फर्स्ट लूक रिलीज


लवकरच डिजीटल व्यासपीठावरून प्रेक्षकांच्या भेटीला अभिनेता इमरान हाश्मी येत आहे. त्याच्या पहिल्याच वेबसिरीजचे ‘बार्ड ऑफ ब्लड’ असे नाव आहे. तो या वेबसिरीजमध्ये गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच त्याचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.

इमरानसोबत ‘बार्ड ऑफ ब्लड’ या वेबसिरीजमध्ये विनीत कुमार सिंग, शोभिता धुलीपाला, क्रिती कुल्हारी आणि रजीत कपूर हे कलाकार झळकणार आहेत. या वेबसिरीजचे दिग्दर्शन रिभू दासगुप्ता हे करत आहेत. तर, या वेबसिरीजची निर्मिती शाहरुख खानच्या रेड चिली अंतर्गत होत आहे. बिलाल सिद्दीकी यांच्या २०१५ मध्ये आलेल्या पुस्तकावर ही वेबसिरीज आधारित आहे.


मी या वेबसिरीजमध्ये भूमिका साकारण्यासाठी फार उत्सुक असल्याचे इमरानने म्हटले आहे. कोणत्याही सीमांची मर्यादा कथेला नसते. माझ्यासाठी एक कलाकार म्हणून ही भूमिका एक आव्हान होते. मी हे आव्हान स्विकारण्यासाठी तयार आहे, असेही तो म्हणाला.

नेटफ्लिक्सवर २७ सप्टेंबर पासून या वेबसिरीजचे भाग पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे ही वेबसिरीज हिंदी, उर्दु आणि इंग्रजीसह इतरही भाषांमध्ये प्रसारित होणार आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत इमरान ‘चेहरे’ चित्रपटातही भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा या चित्रपटातील लूक प्रदर्शित झाला होता.

Leave a Comment