या लव्हबर्ड्सने अनोख्या अंदाजात स्विकारले ‘बॉटल कॅप चॅलेंज’


सोशल मीडियावर सध्याच्या घडीला ‘बॉटल कॅप चॅलेंज’ धुमाकुळ घालत आहे. हे चॅलेंज अक्षय कुमारने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आले. हे आव्हान स्वीकारण्यापासून कलाविश्वातील इतरही कलाकारही स्वत:ला रोखू शकले नाही. आता हे चॅलेंज सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल या लव्हबर्ड्सने अनोख्या अंदाजात स्वीकारले आहे. सुष्मिताच्या दोन दत्तक मुली रेने आणि अलिशा यांनीही या चॅलेंजमध्ये सहभाग घेतल्यामुळे हे चॅलेंज एकप्रकारचे फॅमिली अॅक्ट झाले आहे.


सोशल मीडियावर सुष्मिताने एक व्हिडिओ शेअर केला आहे. सुष्मितासह तिच्या दोन्ही मुली आणि रोहमन शॉलदेखील या व्हिडिओमध्ये आपल्या किकने बॉटलचे झाकण उडवताना दिसत आहेत. चाहतेही सुष्मिता आणि रोहमनच्या या व्हिडिओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. सुष्मिता आणि रोहमनच्या ब्रेकअपच्या चर्चा काही दिवसांपूर्वीच माध्यमांत रंगल्या होत्या. पण, दोघांनीही आपल्या नात्यात सर्वकाही सुरळीत असल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Comment