साहोमधील पहिल्या गाण्याचा फर्स्ट लूक रिलीज


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला प्रभास आणि श्रद्धा कपूर यांची जोडी असलेला ‘साहो’ चित्रपट येणार असून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच जबरदस्त अॅक्शन असलेल्या या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. प्रभास आणि श्रद्धाची दमदार झलक या टीझरमध्ये पाहायला मिळाली. या चित्रपटातील पहिले गाणेदेखील आता लवकरच रिलीज करण्यात येणार आहे. तत्पूर्वी या गाण्याचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.


या गाण्याचे बोल ‘सायको सय्या’ असे असणार आहेत. प्रभास आणि श्रद्धाचा धमाकेदार डान्स या गाण्यात पाहायला मिळणार आहे. त्या दोघांचाही या गाण्यातील लूक रिलीज करण्यात आला आहे. २०१७ मध्येच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. आता या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. चित्रपटाचा ट्रेलर अद्याप रिलीज करण्यात आलेला नसला तरी लवकरच या चित्रपटातील पहिले गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हा चित्रपट यावर्षी १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू आणि हिंदी अशा ३ भाषांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ हा चित्रपटदेखील याचदिवशी रिलीज होणार असल्यामुळे ‘साहो’ला बॉक्स ऑफिसवर टक्कर मिळेल. तसेच या दोन चित्रपटांच्या शर्यतीत जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ हा चित्रपटही रिलीज होणार आहे. आता या चित्रपटाच्या शर्यतीत बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट बाजी मारतो, हे पाहणे रंजक ठरेल.

Leave a Comment