‘मिशन मंगल’चे नवे पोस्टर तुमच्या भेटीला


लवकरच प्रेक्षकांच्या भारताच्या मंगल मोहिमेची खरी कथा मांडणारा ‘मिशन मंगल’ चित्रपट भेटीला येणार आहे. प्रेक्षकही आतुरतेने नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा विषय घेऊन येणाऱ्या या चित्रपटाची वाट पाहत आहेत. त्यातच आता या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

View this post on Instagram

#MissionMangal ,a film which I hope will inspire as well as entertain. A film which I’ve done specially for my daughter and children her age to familiarise them with the incredible true story of India’s mission to Mars! मिशन मंगल फिल्म, मैं उम्मीद करता हूँ, उतनी ही प्रेरित करे, जितनी की वो मनोरंजन करे I यह फिल्म मैंने ख़ास करके अपनी बेटी और उसकी उम्र के बच्चों के लिए की है ताकि उन्हें भारत के महान मंगल अभियान की सच्ची घटना के बारे में पता चले I @taapsee @aslisona @balanvidya @sharmanjoshi @nithyamenen @iamkirtikulhari @foxstarhindi #HGDattatreya #CapeOfGoodFilms #HopePictures #JaganShakti @isro.in

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on


अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, किर्ती कुल्हारी, निथ्या मेनन आणि शर्मन जोशी यांची झलक या पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे. या पोस्टरवर आकाशाला सीमा नसतात, असे लिहिले गेले आहे. स्त्री शक्तीची कथा या चित्रपटातून जगासमोर मांडली जाणार आहे.


सोनाक्षीने हे पोस्टर ही कहाणी आहे, सामान्य लोकांच्या असामान्य स्वप्नांची, असे म्हणत शेअर केले आहे. दरम्यान आर. बाल्की आणि जगन शक्ती दिग्दर्शित हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०१९ ला प्रदर्शित होणार आहे. तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत आहेत.

Leave a Comment