डोळ्यांवर पट्टी बांधून टायगरने पूर्ण केले बॉटल कॅप चॅलेंज


सोशल मीडियात सध्या व्हायरल होत असलेले ‘बोटल कॅप चॅलेंज’ आपल्या जबरदस्त अॅक्शनसाठी ओळखल्या जाणाऱ्या टायगर श्रॉफने देखील स्वीकारले आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. पुन्हा एकदा टायगरचे अॅक्शन स्कील या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे.


टायगरचा व्हिडिओ अक्षयपेक्षाही अधिक खास आहे. या मागचे प्रमुख कारण म्हणजे यात टायगर डोळ्यांवर पट्टी बांधून किकने बाटलीचे बूच अचूक उडवतो आणि बाटली जागेवरच स्थिर राहते. निश्चितच टायगरचा हा अनोखा स्टंट त्याच्या चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.

दरम्यान, बॉटल कॅप चॅलेंज टायगरशिवाय अभिनेता कुणाल केमूनेही स्वीकारले आहे. पण त्याने किकने बूच उडवण्याऐवजी तो हाताने ते उघडून पाणी पिताना दिसत आहे. दरम्यान टायगर श्रॉफच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास नुकतेच तो स्टूडंट ऑफ द ईअर २ मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर आता तो बागी ३ आणि रॅम्बो चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

Leave a Comment