तुमच्या भेटीला आला सिद्धार्थ-परिणीतीची ‘जबरिया जोडी’चा ट्रेलर


सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा या जोडीची ऑनस्क्रिन केमिस्ट्री आपण ‘हसी तो फसी’ चित्रपटात आपण पाहिलीच आहे. त्यानंतर खूप वर्षांनी ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. त्यांच्या आगामी चित्रपटाचे जबरिया जोडी असे शीर्षक असून या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

बिहारच्या पकडवा विवाह पद्धतीवर आधारित हा चित्रपट असणार आहे. सिद्धार्थ हुंड्याच्या प्रथेला थांबवण्यासाठी नवरदेवांच्या डोक्यावर बंदुक ताणून त्यांना विवाह करण्यास भाग पाडतो. बिहारमध्ये तीन प्रकारच्या जोड्या असतात. एक अरेंज मॅरेज, नशीबवाल्यांचे लव्ह मॅरेज तर हुंड्यावाल्यांची जबरिया जोडी, असे शब्द ट्रेलरच्या सुरूवातीला कानावर पडतात.

दरम्यान परिणीती आणि सिद्धार्थच्या प्रेमाची झलकही ट्रेलरममध्ये पाहायला मिळते. मात्र, काही वेळातच मला राजकारणात प्रवेश करायचा असल्याने या सर्व गोष्टींमध्ये पडायचे नसल्याचे म्हणत सिद्धार्थ परिणीतीसोबतचे नाते तोडतो. यानंतर परिणीती सिद्धार्थचे अपहरण करून त्याला लग्न करण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न करते. या दरम्यान घडणारे अनेक विनोद ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात. येत्या २ ऑगस्टला प्रशांत सिंग यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट रिलीज होत आहे.

Leave a Comment