तुम्ही ऐकले आहे का ‘मलाल’चे टायटल ट्रॅक ?


दिग्दर्शक संजय लीला भंसाळी हे आपल्या भव्यदिव्य चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांनी आजवर रामलीला, बाजीराव मस्तानी आणि त्यानंतर पद्मावत सारखे अनेक भव्य चित्रपट हिंदी सिनेसृष्टीला दिले आहेत. त्यातच ते लवकरच कुठला चित्रपट घेऊन आपल्या भेटीला येणार याबाबत सिनेरसिक देखील आतुर असतात. आता लवकरच त्यांचा मराठमोळ टच असलेला ‘मलाल’ हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रेक्षकांचा आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील गाण्यांना आणि ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता नुकतेच या चित्रपटातील नवे गाणे रिलीज करण्यात आले आहे. एक मलाल हैं ऐसा, असे शीर्षक असलेले हे गाणे चित्रपटाचे टायटल ट्रॅक आहे. या गाण्यात नात्यामध्ये आलेल्या दुराव्यानंतर एकमेकांसोबत घालवलेल्या जुन्या क्षणांच्या आठवणीत बुडालेले मिझान आणि शर्मिल यांची झलक पाहायला मिळते.

आतापर्यंत चित्रपटातील रिलीज झालेल्या सर्वच गाण्यांना मराठमोळा टच होता. पण हे एक भावनिक गाणे आहे. या गाण्याला शैल हाडा यांनी आवाज दिला आहे. तर प्रशांत इंगोले यांचे बोल आहेत. येत्या ५ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment