सिल्वेस्टर स्टॅलोन घेऊन येत आहे ‘रॅम्बो – लास्ट ब्लड’


सिल्वेस्टर स्टॅलोनच्या आगामी ‘रॅम्बो’पटाची प्रतीक्षा जगभरातील प्रेक्षकांना लागली आहे आता प्रदर्शनासाठी रॅम्बो चित्रपटाचा पाचवा भाग सज्ज झाला असून नुकतेच याचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.


स्टॅलोनच्या रॅम्बो सिरीजमधील ‘फर्स्ट ब्लड’ या पहिल्या चित्रपटाने इतिहास रचल्यानंतर प्रेक्षकांना त्याचे साहस पाहण्याची सवयच लागली होती. आता या सिरीजचा पाचवा भाग येत असून ‘रॅम्बो – लास्ट ब्लड’ असे याचे शीर्षक आहे. हा चित्रपट भारतात २० सप्टेंबर २०१९ला रिलीज होईल. ‘रॅम्बो – लास्ट ब्लड’चे वितरण पीव्हीआर आणि एमव्हीपी एंटरटेन्मेंटच्यावतीने होणार आहे. हे पोस्टर ट्विटरवर ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी शेअर केले आहे.

Leave a Comment