रितिकाला पाहून हे काय म्हणत आहेत रोहितचे चाहते?


मँचेस्टर – वेस्ट इंडिजविरुद्ध गुरुवारी झालेल्या सामन्यात 125 धावांनी भारताने मोठा विजय मिळवला. हा सामना पाहण्यासाठी ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममध्ये भारताचा सलामीवीर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहीने हजेरी लावली होती. रोहितच्या चाहत्यांचा या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.


रोहितची पत्नी रितिकाकडे पाहून भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यादरम्यान क्रिकेटचाहते, ’10 रुपिया में पेस्सी, रोहित शर्मा सेक्सी!’ म्हणत तिला चिडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. रितिकाच्या चेहऱ्यावरही चाहत्याच्या घोषणा ऐकून हसू आले होते. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे.

Leave a Comment