आपल्यापैकी अनेकजणांसाठी बॉलीवूड सितारे जीव की प्राण असतात. ते त्यांच्यासाठी काहीपण करण्यासाठी तयार असतात. त्यातच त्यांच्याप्रमाणे स्टाइलिश आणि कूल दिसण्यासाठी ते आवडत्या स्टारचा ड्रेस व लूक कॉपी करतात. त्यातच अभिनेत्री करीना कपूर देखील तरूणांमध्ये स्टाईल व फॅशनमुळे चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर करीना कपूरचा एका टॉपमधील फोटो व्हायरल झाला आहे. हा टॉप महागडा असून या किमतीत एक टॉपचे छोटेसे दुकान उघडले जाऊ शकते.
बेबोच्या या टँक टॉपची किंमत ऐकून तुम्ही देखील व्हाल हैराण
नुकताच लंडनमधील हॅम्पशायर येथील आई बबीता व बहिण करिश्मासोबतचा फोटो करीना कपूर हिने सोशल मीडियावर शेअर केला. करीनाने या फोटोत टँक टॉप परिधान केला आहे. या टँक टॉपसोबत तिने नीळ्या रंगाची स्किनी जीन्स आणि ब्राऊन लेदर बुट घातले आहेत. करीनाने परिधान केलेले हे टॉप गुच्ची स्प्रिंग समर कलेक्शनचे असून या टॉपवर स्ट्रॉबेरी प्रिंट आहे. या टॉपवर गुलाबी रंगाची झॅलरदेखील आहे.
भलेही दिसायला करीनाचा हा टॉप साधा असेल पण त्याची किंमत खूप जास्त आहे. जवळपास ७० हजार रुपये या टॉपची किंमत आहे. या बजेटमध्ये ९० ते १०० कॅज्युअल टॉप विकत घेता येतील.