आपल्या हॉट आणि बोल्ड अदांमुळे टीव्हीच्या छोट्या पडद्यावरील अभिनेत्री करिश्मा तन्ना आपला खास प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. त्याचबरोबर ती आपला बहारदार अभिनय आणि बोल्ड लूक यामुळे नेहमीच चर्चेत असते. तसेच सोशल मीडियात देखील ती चांगलीच सक्रिय असते. तिने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा सेक्सी बिकीनी अवतार ज्यात पाहायला मिळत आहे. करिश्माच्या चाहत्यांना स्लो मोशनमध्ये असलेला हा व्हिडिओ भलताच आवडला आहे.
पाण्यात लावली करिश्मा तन्नाने आग
स्लो मोशनमध्ये जलतरण तलावात उडी घेणारी करीश्मा तन्नाच्या चेहऱ्यावरच्या भावमुद्रा चाहत्यांना सहज पाहता येतात. करिश्मा तन्ना व्हिडिओत काळ्या-पांढऱ्या अशा पट्टेदार बिकिनीत पाहायला मिळते. ज्यात करिश्मा खरोखरच सेक्सी वाटते.
दरम्यान, करिश्मा तन्ना सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती या माध्यमातून आपले हॉट आणि तितकेच सुंदर फोटो, व्हिडिओ सातत्याने शेअर करत राहणे आणि त्याच्या माध्यमांतून चाहत्यांपर्यंत पोहोचणे यावर तिचा अधिक भर पाहायला मिळतो.
या आधीही करीश्मा तन्नाने आपले बोल्ड, सेक्सी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. करिश्माच्या चाहत्यांनाही तिचे हे फोटो व्हिडिओ फार आवडतात. त्यामुळे तेसुद्धा न थकता तिच्या सौदर्याचे कौतुक करतात.