हे उपाय अवलंबून घालवा तोंडाला येणारी दुर्गंधी


आपल्यापैकी अनेकांची तोंडातून दुर्गंधी येणे ही समस्या असते. या मागे मुख्य कारण वेळी-अवेळी खाणे आणि त्यानंतर चूळ न भरणे यांसारखी मुख्य कारणे असतात. आपली लाईफ सध्याच्या घडीला घड्याळ्याच्या काट्यावर पळत असते. या दरम्यान सकाळी उठल्यावर तोंड न धुणे, आवश्यक तेवढे पाणी न पिणे ही मुख्य कारणे आहेत. अनेकजण तोंडातून दुर्गंधी येणे या समस्येकडे सर्रासपणे दुर्लक्ष करतात. पण तुमचा चार-चौघांत यामुळे अपमान देखील होऊ शकतो किंवा काही जण तुमच्याशी बोलणे देखील टाळू शकता.

आपले व्यक्तिमत्त्व सुधारायचे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. त्यात तुमच्या व्यक्तिमत्त्वावर तोंडाला दुर्गंधी येणे ही समस्या परिणाम करु शकते. म्हणूनच आम्ही आज तुम्हाला तोंडाची दुर्गंधी घालवण्याचे काही उपाय सांगणार आहोत.

जर घराबाहेर तुम्ही असल्यास तुम्हाला ब्रश करणे शक्य नसते अशावेळी बडीशेप खाल्ल्याने तोंडाला येत असलेली दुर्गंधी कमी होऊ शकते. त्यामुळे नेहमी तुमच्या जवळ बडीशेप ठेवा. तसेच तुम्ही पुदिन्याची 2-3 पाने खावीत. त्याचबरोबर शक्य असल्यास वेलची चा दाणा चघळल्यास तोंडाला येणारी दुर्गंधी त्वरित निघेल. तोंडात एखादी लवंग ठेवल्यानेही तोंडाची दुर्गंधी कमी होते. पार्सलीमध्ये जीवाणूंचा नाश करणारे क्लोरोफिल असल्यामुळे जेवणानंतर पार्सली खावे. हे सर्वात उत्तम माउथ फ्रेशनर आहे.

तुम्ही दालचिनीच्या काड्या चावू शकता किंवा चहात टाकून पिऊ शकता. तोंडाची दुर्गंधी कोथिंबीरची 4-5 पाने किंवा धणे खाल्ल्याने देखील कमी होते. भरपूर पाणी प्यावे शक्य असल्यास दह्याचे सेवन केल्यानेही तोंडाची दुर्गंधी दूर होते. संत्री खाल्ल्याने देखील तोंडाला येणारा उग्र वास कमी होतो.

तुमचे लोकांमध्ये हसे होऊ नये किंवा तुम्हाला अपमानास्पद वाटू नये यासाठी तुम्हाला तोंडाला दुर्गंधी येण्याच्या समस्येपासून स्वत:ला दूर ठेवणे गरजेचे आहे. तुमचे व्यक्तिमत्व आणि तुम्ही स्वत:ला लोकांसमोर कसे सादर करता यावर तुमची ओळख अवलंबून असते. त्यामुळे अशा छोट्या मोठ्या समस्येकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment