१०० फुटाने वाढणार इंदू मिलमधील बाबासाहबांच्या पुतळ्याची उंची


मुंबई – भाजप-शिवसेनेचे सध्या राज्यात सत्तेत असलेले सरकार दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वोपतरी प्रयत्न करत असून १०० फुटाने दादरमधील इंदू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यावेळी त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची ११ फुटाने वाढवण्यात येणार असल्याचे सांगितल्यामुळे पुतळ्याची उंची आता ४५० फूट होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पुतळ्यासाठी सर्व परवानग्या मिळाल्या असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर पुतळ्याचे काम २०२० पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा इंदू मिलमधील स्मारकात उभारण्यात येणार आहे. ग्रंथालय, ई-लायब्ररी विपश्यना केंद्र, सभागृह स्मारकात उभारण्यात येणार आहे. चीनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा इंदू मिलमध्ये उभारण्यात येणारा पुतळा तयार करण्यात येत आहे. मुंबईत पुतळ्याचे सुटे भाग आणून जोडले जातील, अशी माहिती पुतळ्याचे शिल्पकार राम सुतार यांनी दिली होती.

Leave a Comment