राष्ट्रकुल खेळांमध्ये होणार महिला क्रिकेटचा समावेश


नवी दिल्ली – राष्ट्रकुल खेळांमधून नेमबाजी खेळ हद्दपार करण्याचा निर्णयाला भारताच्या कठोर विरोधाला न जुमानता अनुमती देण्यात आली असून महिला क्रिकेट, पॅरा टेबल टेनिस आणि बीच व्हॉलीबॉल या खेळांना राष्ट्रकुल खेळांच्या कार्यकारी मंडळाने मान्यता दिली आहे. या बदलाला राष्ट्रकुल खेळांमध्ये सहभागी होणाऱ्या ५१ टक्के देशांनी आपली सहमती दर्शवली आहे. राष्ट्रकुल खेळांमध्ये नेमबाजीचं स्थान कायम रहावं याबाबत राष्ट्रीय नेमबाजी संघटना आणि भारताची राष्ट्रीय रायफल नेमबाजी संघटना या संस्था प्रयत्नशील होत्या. पण त्याचे प्रयत्न अपूरे पडले.

नेमबाजी खेळाचा सहभाग १९६६ साली झालेल्या किंगस्टन येथे झालेल्या स्पर्धांमध्ये करण्यात आला होता. नेमबाजीने १९७० सालचा अपवाद वगळता आतापर्यंत झालेल्या सर्व स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे. भारताने राष्ट्रकुल खेळांच्या इतिहासात आतापर्यंत ४३८ पदके मिळवली आहेत.

नवीन प्रेक्षकवर्ग राष्ट्रकुल खेळांसोबत महिला क्रिकेट, पॅरा टेबल टेनिस आणि बीच व्हॉलीबॉल या खेळांमुळे जोडला जाईल. पुढच्या महिन्यात या प्रस्तावावर अधिकृतरित्या मतदान होणार आहे. १९९८ साली क्वालालम्पूर येथे झालेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. या स्पर्धेचे सुवर्णपदक दक्षिण आफ्रिकेने मिळवले होते. २०२२ साली होणाऱ्या राष्ट्रकुल खेळांमध्ये क्रिकेटचा सहभाग करावा यासाठी आयसीसी आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने निवीदा दाखल केली होती. बर्मिंगहॅमला २०२२ सालच्या राष्ट्रकुल खेळांचे यजमानपद देण्यात आले आहे.

Leave a Comment