या बाबतीतही विराटने मास्टर ब्लास्टरला टाकले मागे


नवी दिल्ली – सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची गणती जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये होते. त्याचे जगभरात प्रचंड चाहते असून क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीच्या जोरावर विराटने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. असाच एक नवा किर्तीमान त्याने ट्विटरवर केला आहे. याबाबतीत त्याने क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे.


ट्विटरवर ३ कोटी फॉलोअर्सचा टप्पा विराट कोहलीने पार केला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही त्याने मागे टाकले आहे. विराटने हा पल्ला गाठल्यानंतर चाहत्यांचे आभार मानले आहेत. तुम्ही दिलेल्या प्रेमा आणि पाठिंब्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार..#30MillionStrong’ असे ट्विट विराटने केले आहे.

विराटने त्याचबरोबर ३ कोटी फॉलोअर्सबाबत त्याच्या प्रतिक्रियेचा एक व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात धोनीने षटकार मारल्यानंतर कोहलीने जे हावभाव केले होते त्याचा उपयोग विराटने आपल्या प्रतिक्रियेत केला आहे.

Leave a Comment