१४ मिनिटांचा शॉट अमिताभ यांनी एकाच टेकमध्ये केला ओके


बॉलिवूडचा शहेनशाह म्हणून अभिनेता अमिताभ बच्चन यांना उगाच म्हटले जात नाही. ते अत्यंत निष्ठेने दिग्दर्शकाला काय हवे आहे ते समजून घेतात आणि टेक देतात. त्यांनी नुकतीच ‘चेहरे’ चित्रपटाच्या शूटींगच्यावेळी कमाल करुन दाखवली. त्यांना १४ मिनिट लांबलचक डायलॉग म्हणायचा होता. त्यांनी तो चक्क एकाच टेकमध्ये ओके केल्यामुळे निर्मात्यासह सेटवरचे सर्वचजण अवाक झाले.

बिग बी यांनी एकाच टेकमध्ये ‘चेहरे’ चित्रपटासाठी १४ मिनीटांचा सीन केल्यानंतर निर्माता आनंद पंडित यांनी अमिताभ यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, अशा एका चित्रपटाचा मी भाग आहे ज्यात एक ऐतिहासिक सीन आहे. चौदा मिनिटांचा सीन देणे केवळ अवघड नाही तर त्यासाठी समर्पणाची आवश्यकता असते. ती गोष्ट अमिताभ यांनी निपुणतेने पार पाडली. सेटवरचे वातावरण अत्यंत शांत होते. पण टेकनंतर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. ते महान आहेत आणि आम्हां सर्वंसाठी ते प्रेरणादायी आहेत.

‘चेहरे’ हा एक रहस्यमय रोमांचक चित्रपट आहे. अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. रुमी जाफरी याचे दिग्दर्शन करीत आहेत. आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एंटरटेनमेंट प्राईवेट लिमिटेड याचे निर्माता आहेत.


अमिताभ यांचे साऊंड आर्टिस्ट रेसुल पूकेट्टी यांनीदेखील कौतुक केले आहे. पूकेट्टी यांनी ट्विटरवर म्हटले आहे कि, अमिताभ बच्चन यांनी आज भारतीय चित्रपटासाठी इतिहास रचला. त्यांनी शेवटच्या दिवशी ‘चेहरे’चा शेवटचा शॉट…एकाच टेकमध्ये १४ मिनीटांचा सीन पूर्ण केला आणि संपूर्ण टीमने उभे राहून टाळ्या वाजवल्या. प्रिय सर, निःसंशय तुम्ही जगातील सर्वात सर्वश्रेष्ठ व्यक्तींपैकी एक आहात.

Leave a Comment