‘कबीर सिंह’चे चौथे गाणे तुमच्या भेटीला


चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी यांच्या ‘कबीर सिंह’ चित्रपटाची आतुरता आहे. सध्या हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असताना या चित्रपटातील आता चौथे गाणे रिलीज करण्यात आले आहे. चाहत्यांचा यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ३ गाण्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. शाहिद आणि कियाराची रोमॅन्टिक केमेस्ट्री आता चौथ्या गाण्यातही पाहायला मिळते.

या गाण्याचे बोल ‘तेरा बन जाऊंगा’, असे आहेत. शाहिद आणि कियारा या गाण्यात एकमेकांची काळजी घेताना दिसतात. या गाण्यावर अखिल सचदेवा आणि तुलसी कुमारच्या आवाजाचा स्वरसाज चढला आहे. तर, या गाण्याचे बोल कुमार यांनी लिहिले आहेत. ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचा ‘कबीर सिंह’ हा चित्रपट रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप वांगा हे केले आहे. बॉक्स ऑफिसवर ‘अर्जुन रेड्डी’ चित्रपट सुपरहिट ठरला होता. येत्या २१ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment