विंटेज मोटारसायकलचा फील देणारी टायटन आर इलेक्ट्रिक बाईक


इलेक्ट्रिक बाईक निर्माता टेम्पसने नुकतीच त्यांची लेटेस्ट इलेक्ट्रिक बाईक टायटन आर नावाने सादर केली आहे. ही बाईक इलक्ट्रिक बाईकपेक्षाही विंटेज मोटारसायकलचा फील मानले जात आहे कारण ती कार्यालयात जाण्यायेण्यासाठी परफेक्ट बाईक आहेच पण फिरण्याबरोबरच ती ऑफ रोडींग करता येते. या बाईकसाठी ओल्ड एज टेस्टेड मटेरियलचा वापर करण्यात आला असून तिची फ्रेम एअरक्राफ्ट ग्रेड स्टीलपासून बनविली गेली आहे.


ही बाईक पॅडल न मारता ६५ किमी धावणार आहे. बाईकच्या स्लिम स्ट्रक्चरवर गॅस टँक सारखा दिसणारा टँक बसविला गेला आहे आणि मागे लेदर सीट आहे. या बाईकच्या फ्रंटला २ मोठे एलईडी लाईट आहेत तर रिअरला दोन छोटे मॉडर्न लुकचे टेललाईट दिले गेले आहेत. क्लासिक कॅफे रेसरसारखा या बाईकचा लुक असून या इ बाईकमध्ये पासवर्ड प्रोटेक्शन इग्निशन सिस्टीम आहे त्यामुळे बाईक चोरी होण्याचा धोका कमी झाला आहे. बाईक मध्ये कलर एलसीडी डिस्प्ले आहे. त्यात वेळ, वेग, रेंज, बॅटरी पर्सेंट अशी माहिती मिळू शकणार आहे. बॅटरी १००० व्होल्टची आहे. ही बाईक ताशी ४५ किमी वेगाने धावेल.

या बाईकला रीमुव्हेबल लिथियम आयन बॅटरी दिली गेली आहे. ती एकदा फुलचार्ज केली कि ६५ किमी अंतर कापेल आणि बॅटरी फुलचार्ज होण्यास ४ ते ५ तास लागणार आहेत. बाईकचे वजन ३४ किलो आहे मात्र ती १३६ किलो वजन वाहून नेण्यास सक्षम आहे. या बाईकची किंमत २९९९ डॉलर्स म्हणजे साधारण दोन लाख रुपये आहे.

Leave a Comment