मला उपचारासाठी देशाबाहेर जावे लागले – मेहुल चोक्सी


मुंबई – मुंबई उच्च न्यायालयात पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेल्या नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्सी याने प्रतिज्ञापत्रात सादर केले असून या प्रतिज्ञापत्रात देश सोडून मी पळालो नसून मला देशाबाहेर उपचारासाठी जावे लागले असल्याचे म्हटले आहे. न्यायालयात त्याच्या आजाराचे पुरावेही मेहूल चोक्सीने सादर केले आहेत.

सध्या आपण अँटिग्वामध्ये राहत असून आपण तपास यंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करत असल्याचे चोक्सीने म्हटले आहे. तपास अधिकारी न्यायालयाने परवानगी दिल्यास दिल्यास चौकशीसाठी येथे येऊ शकतात, असेही त्याने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

मी भारतातून पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यामुळे पलायन केले नाही. मला देश सोडावा उपचारांसाठी लागला. माझ्या तब्येतीत सुधारणा झाल्यास मी लवकरच भारतात परत येईन. मला न्यायालयात सुनावणीवेळी उपस्थित राहण्याची इच्छा आहे. पण मी आजारपणामुळे प्रवास करू शकत नाही. माझी सध्या विशेष न्यायालयासमोर आणि तपास अधिकाऱ्यांसमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे खटल्याला उपस्थित राहण्याची तयारी असल्याचे चोक्सीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच, आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत, असा दावाही त्याने या पतित्रापत्रात केला आहे.

१३००० कोटी रुपयांचा गैरव्यवहार गेल्या वर्षी उघडकीस आलेल्या पीएनबी घोटाळ्यात झाला होता. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे यामध्ये प्रमुख आरोपी आहेत. बँकेला फसवून कर्जे न फेडताच त्यांनी देशातून पळ काढला आहे. या घोटाळ्यात बँकेच्या काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Leave a Comment