भ्रष्टाचारी पोलिसांनी नाना पाटेकरांना दिली क्लिन चीट – तनुश्री दत्ता


अभिनेत्री तनुश्री दत्ताने सोशल मीडियावर गाजलेल्या #MeToo या चळवळीअंतर्गत अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. नाना पाटेकर यांच्याविरोधात याप्रकरणी तक्रारही दाखल करण्यात आली होती. पण मुंबई पोलिसांनी या प्रकरणात नानांना क्लिन चिट दिली आहे. ओशिवरा पोलिसांनी न्यायालयात तनुश्रीने केलेल्या आरोपांसंदर्भात कोणतेही पुरावे उपलब्ध नसल्याचा अहवाल दाखल केल्यामुळे नाना पाटेकरांना दिलासा मिळाला आहे. पण असे असले, तरीही तनुश्रीने या अहवालात काहीही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. तिने यासोबतच मुंबई पोलिसांवरही निशाणा साधला आहे.

भ्रष्टाचारी पोलिसांनी भ्रष्ट माणसाबद्दल दिलेला हा अहवाल आहे. केवळ सोबतच नानांनी गैरवर्तवणूक केली नाही, तर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना अशी वागणूक दिली असल्याचे, तनुश्री म्हणाली. नाना पाटेकरांवर तनुश्रीने गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर #MeToo चळवळीची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. नाना पाटेकरांचे नाव समोर आल्यानंतर इतरही अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेल्या कथा व्यक्त केल्या. नाना पाटेकर यांच्या बाजुने उभे राहणारे कलाकारही या प्रकरणात समोर आले. तर, तनुश्रीला काहीजणांनी पाठिंबा दिला. या प्रकरणात आता सध्यातरी नानांना क्लिन चीट मिळाली आहे. यामध्ये आणखी कोणते वळण येते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment