काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधीच कायम राहतील – सुरजेवाल


नवी दिल्ली – काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांनीच कायम राहावे, अशी इच्छा काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे. राहुल गांधीच अध्यक्ष म्हणून कायम राहतील या काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाल यांच्या वक्तव्याला काँग्रस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी दुजोरा दिला आहे. पण या वृत्ताला राहुल गांधींनी पुष्टी दिलेली नाही. मागील अनेक दिवासांपासून काँग्रेसच्या नेतृत्वावरून खल सुरू आहे.

राहुल गांधीनी लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर पराभवाची जबाबदारी घेत काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पण त्यांचा राजीनामा काँग्रस कमिटीने स्वीकारला नव्हता. काँग्रेस कमिटीने याविषयी राहुल गांधी राजीनामा न देता अध्यक्षपदी कायम राहावे, असा आग्रह धरला होता. पण आपल्या राजीनाम्यावर राहुल गांधी ठाम आहेत.

काँग्रेसला अध्यक्ष म्हणून राहुल गांधीच हवे आहेत, असा पुनरुच्चार काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला होता. गांधी परिवारातील कोणताही सदस्य नुकत्याच पार पडलेल्या या बैठकीत हजर नव्हता. काँग्रेस अध्यक्षपदासाठी या बैठकीत चर्चा झाली. पण राहुल गांधींना पर्याय नसल्याचे सांगत त्यांनाच कायम ठेवण्याच निर्णय घेण्यात आला. काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी या विषयी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “बुधवारी झालेल्या बैठकीत काँग्रेस कमिटीने घेतलेल्या निर्णयापेक्षा मी काही वेगळे बोलू इच्छीत नाही. राहुल गांधीच काँग्रेस अध्यक्ष होते, आहेत आणि यापुढेही राहतील.

Leave a Comment